धक्कादायक! साखर झोपेत असतांनाच वाजला फोन; घटना समजताच उडाला थरकाप

अंबासन (जि. नाशिक) : पहाटेची वेळ...अंगण झाडण्यासाठी बाहेर आल्या. दाराबाहेर पाऊल ठेवताच दिसले समोर असे काही की त्या पळतच घरात परत गेल्या. अन् घरातल्यांना बोलावलं तेही घाबरलेच...वाचा काय घडले नेमके?

अशी आहे घटना

घरोघरी दिवाळीची धामधूम सुरू होती. अंबासन (ता.बागलाण) येथील बसस्थानक परिसरात रहदारीच्या ठिकाणी रामचंद्र राजधर रामोळे यांच्या घरी धक्कादायक घटना घडली. रामोळे हे कुटुंबियांना बुधवार (ता. १८) दिवाळीनिमित्ताने अमळनेर येथे गेले होते. पहाटेच्या सुमारास त्यांची आई सरस्वतीबाई अंगणात झाडू मारण्यासाठी गेले असता घराचा कडीकोंडा तोडलेला दिसून आला. त्यांनी तातडीने लहान मुलगा दिपक रामोळे यांना माहिती दिली. लागलीच बसस्थानकावर येऊन पाहणी केली असता कपाट फोडलेले, संपूर्ण साहीत्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. भाऊ रामचंद्र रामोळे यांना घरात चोरी झाल्याची फोनवरून माहिती दिली. त्यांनी अमळनेरहुन तातडीने अंबासन गाठले. देवस्थानातील नवसपुर्ती दोन डब्बे चिल्लर अंदाजे वीस हजार, चौतीस हजार रोख, मगंलपोत चाळीस हजार असा एक लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे सांगितले.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण बी. पारधी यांनी तातडीने दखल घेत पाहणी करून पंचनामा केला. घराची संपुर्ण माहिती असणा-याच चोरट्यांनी घरफोडी केली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान