धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना

ओझर आत्महत्या,www.pudhari.news

नाशिक (ओझर) : सोनेवाडी येथे राहणार्‍या हिरामण अशोक लवांड (39) याने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हिरामण लवांड याने व्हिडिओ करत ‘पत्नीच्या माहेरची माणसं वेळोवेळी येऊन मला व मुलास मारहाण करतात, मानसिक त्रास देतात, या छळास कंटाळून जीवनयात्रा संपवित आहे’, असे नमूद केले आहे. पोलिसांनी मुलगा ऋतिक लवांड याच्या फिर्यादीवरून सासरच्या चार जणांविरुद्ध ओझर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

येथील सोनेवाडी परिसरात हिरामण अशोक लवांड आपली पत्नी व दोन मुलांसह राहतात. गेल्या काही महिन्यांपासून हिरामणचे सासरे बाबूराव केरू चव्हाणके, शालक किरण बाबूराव चव्हाणके (रा. कीर्तांगळी, ता. सिन्नर) व शुभम गोविंद ढोबळे (रा. म्हाळसाकोरे, ता. निफाड) व एक अज्ञात व्यक्ती असे चौघे हिरामण यास सातत्याने मारहाण करून त्याचा छळ करीत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. छळास कंटाळून हिरामण लवांड याने मंगळवारी (दि.23) विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

हेही वाचा :

The post धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना appeared first on पुढारी.