धक्कादायक! हॉटेलात तरुणीचा संशयास्पद मृत्यू; नाशिकमध्ये खळबळ

नाशिक : येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेलात मित्रासोबत राहायला गेलेल्या तरुणीचा संशायास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तरुणीच्या मृत्यूचा तपास सुरु आहे.

अधिक माहिती अशी की...

अर्चना व तन्मय या दोघांनी नाशिकच्या सीबीएस येथील हॉटेल सिटी पॅलेस मघ्ये रुम क्रमांक 203मध्ये मंगळवारी (ता. १२) दुपारी 3 वाजता चेक इन केले होते. ते आज बुधवारी (ता. १४) दुपारी चेक आउट करणार होते. मात्र सकाळी अकराला  त्यांनी बुधवारी पुढे पुन्हा रूम कायम केली. दरम्यान तन्मय याने त्यांच्या कुटुंबियांना फोन करुन बोलावून घेतले. सांयकाळी पाचच्या सुमारास जेव्हा सगळे कुटुंबीय हॉटेलमध्ये पोहचले तेव्हा सगळी धावपळ उडाली.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

तरुणाची चौकशी सुरु

मृत आढळलेल्या तरुणीचे नाव अर्चना सुरेश भोईर (21, रा. कल्लाले मान, बोईसर, ठाणे)  पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव तन्मय प्रवीण धानवा (21, रा. मासवन कोळीपाडा, पालघर, ठाणे) आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मित्राला ताब्यात घेतले आहे. व घचनेता तपास केला जात आहे. पोलीस सध्या तरुणाची चौकशी करत असून त्याच्याकडून नेमकं काय झालं याचा पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा