Site icon

धधुळे : शेणपूरला भरदिवसा घरावर दरोडा ; दहा लाखांचा ऐवज लंपास

पिंपळनेर (धुळे) : पुढारी वृत्तसेवा
मौजे शेणपूर येथे गावाच्या मध्यभागी असलेल्या संजय उत्तम काकुस्ते यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना आज सकाळी दहावाजेच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसापासून संजय काकुस्ते हे गावी गेले होते त्याचीच संधी साधत चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटीतून लॉकर तोडून सुमारे 18 तोळे सोने व आठ ते दहा हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल लंपास केला.

आजच्या सोन्याच्या बाजार भावानुसार तब्बल दहा ते बारा लाखाचा हा ऐवज असल्याचे समजते. ग्रामीण भागातील शेणपूर गावात अत्यंत रहदारीच्या ठिकाणी इतकी मोठी चोरी पहिल्यांदाच झाली आहे. संजय उत्तम काकुस्ते यांच्या फिर्यादी नुसार 18 तोळे सोने व आठ ते दहा हजाराची रोकड असा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्याकडून माहिती मिळाली आहे.

साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या अधिपत्याखाली पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल पाटील, प्रमोद जाधव तसेच शेणपूरचे पोलीस पाटील हेमराज काळे यांच्या मदतीने तपासाला वेग देऊन लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावला जाईल असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी धुळे जिल्हा मोबाईल स्कॉड पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडील श्वान पथकाचा वापर करून चोरट्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला व घरातील सर्व वस्तूंचे, हातांच्या ठशांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामुळे तपासाला मोठी मदत त्यांच्यामार्फत निश्चित होणार असे गावातील नागरिकांकडून व पोलीस प्रशासनाकडून बोलले जात आहे.

हेही वाचा :

The post धधुळे : शेणपूरला भरदिवसा घरावर दरोडा ; दहा लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version