’धन्यवाद मोदीजी’ : भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान यांना आभारपत्र

पत्र www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

’धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या अंतर्गत भाजपा वैद्यकीय आघाडीच्या महिला प्रेदेश संयोजक डॉ. चंचल साबळे यांच्या प्रयत्नातून 51,000 आभारपत्र भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांच्या महाराष्ट्रातील लाभार्थींनी लिहिलेली १५ लाख ’धन्यवाद मोदीजी’ ही आभारपत्रे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयातून पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यात आली. या कार्यक्रमात सहकारमंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या संयोजक प्रदेश सचिव श्वेता शालिनी व भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. अजीत गोपछडे व महिला प्रेदेश संयोजक डॉ. चंचल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आघाडीतर्फे ’धन्यवाद मोदीजी’ लाभार्थी पोस्टकार्डही सुपुर्त करण्यात आले.

हेही वाचा:

The post ’धन्यवाद मोदीजी’ : भाजपा प्रदेश कार्यालयातुन पंतप्रधान यांना आभारपत्र appeared first on पुढारी.