
दीपक श्रीवास्तव : निफाड (जि. नाशिक)
होळी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे धुळवड निफाडला धुळवडी चे काही वेगळेच महत्त्व आहे. संध्याकाळी गावातून वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. घराघरातून लहान मोठ्या मुलांना वीराचा पोशाख घालून आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवले जाते. परंतु याआधी दिवसभर गावात डसन डुकरी धुमाकूळ घालत असतात. डसन डुकरी म्हणजे चित्रविचित्र पोशाख करून लहान मुलांना घाबरवणारी सोंगे होत.
धुळवडीच्या निमित्ताने चित्रविचित्र शक्यतो घाणेरडे फाटके तुटके कपडे घालून आणि भुतासारखा वेश करून काही हौशी तरुण गावभर फिरत असतात. ही डसनडूकरी बघणे आणि त्यांच्या मागे मागे गावभर भटकणे हे छोट्या छोट्या बालकांचे आवडते काम होऊन बसते. मोठी माणसे देखील हा प्रकार आनंदाने एन्जॉय करीत असतात. यंदा मात्र या डसन डुकरी ने मॉडर्न अवतार घेतले असल्याचे निफाडकरांना बघायला मिळाले. गावची अनेक वर्षांची परंपरा जोपासण्यासाठी गावातीलच काही उत्साही तरुणांनी गलिच्छ ओंगळवाण्या सोंगांच्या ऐवजी गोरिला, स्पायडरमॅन, साधू, माकड, अस्वल, वन्यप्राणी अशी विविध प्रकारची नाविन्यपूर्ण वेशभूषा करून निफाड शहरात एकच धमाल उडवून दिली.
ग्रामस्थांनी देखील या नाविन्यपूर्ण कल्पनेला भरभरून दाद देत त्यांना बक्षीसी दिली. जुन्या परंपरांना नवे रूप देण्याचा हा निफाडकर युवकांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद म्हणता येईल.
हेही वाचा :
- मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला
- Bribery case | कर्नाटकातील भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामीन मंजूर
- IND vs AUS : अहमदाबाद कसोटीत ९ धावा केल्यानंतर पुजारा करू शकतो सचिन-द्रविडच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री
The post धुळवड निफाडची : मॉडर्न झाली डसनडुकरी appeared first on पुढारी.