
धुळे : पुढारी वृत्तसेवा
बोरकुंड- दोंदवाड शिवारातील पाटचारी तब्बल एक दशकापासून बंद होती. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानने या पाटचारीच्या खोलीकरण व रुंदीकरणासाठी पुढाकार घेतल्याने ही पाटचारी खळखळ वाहू लागली आहे. यास दोंदवाड शेतकर्यांचे सहकार्य लाभले. केवळ १० दिवसात ५.८ किलोमीटर लांबीची ही पाटचारी दुरुस्त होऊन पाणी सुटल्याने परिसरातील सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. बोरकुंड- दोंदवाड परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
वाटचाल शाश्वत विकासाकडे या विचारांतून चालणार्या इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या वतीने शेतकर्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रकर्षाने प्रयत्न केले जातात. बोरी पट्टयातील नाले व पाटचारीच्या रुंदीकरणासाठी व खोलीकरणासाठी, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच मदतीचा हात दिला जातो. यातच हे कामी मार्गी लावण्यात आले. पुरमेपाडा डाव्या कालव्यातून, बोरकुंड पाटचारीपासून दोंदवाड शिवारापर्यंतच्या शेतकऱ्यांना सिंचन क्षेत्रात पाणी पुरविणारी पाटचारी गेल्या दहा वर्षापासून दुरुस्त अभावी बंद होती. शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करूनही हे पाटचारी दुरुस्तीचे काम होत नव्हते. शासन दरबारी चकरा मारुन उपयोग होत नसल्याने शेवटी लाभार्थी शेतकर्यांनी इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे यांना भेटून या पाटचारीबद्दल व्यथा मांडली. यातून लगेच मार्ग निघाला व नेहमीप्रमाणे प्रतिष्ठानने मदतीचा पुढे केला. सदर पाटचारी खोलीकरण व रुंदीकरणासाठी प्रतिष्ठानच्या वतीने जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. दोंदवाडच्या लाभधारक शेतकऱ्यांनीही याकामी लोकसहभाग नोंदवला. व केवळ १०-११ दिवसात तब्बल ५.८० किलोमीटर लांबीची ही पाटचारी दुरुस्त करण्यात आली. दोन दिवसापूर्वी या पाटचारीत, पुरमेपाडा धरणाच्या मुख्य कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे सिंचनास मदत होणार आहे. बोरकुंड व दोंदवाड पारिसरातील शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. लोकसहभागातून सार्वजनिक हिताची कामे कामे कशी केली जाऊ शकतात हे बोरीपट्टयाने, यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. याबाबतीत दोंदवाडच्या शेतकऱ्यांचे व इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा:
- दीपिकाच्या टॅटूने वेधले लक्ष
- रुचिराच्या कलरफूल फोटोंनी चाहते घायाळ
- जळगाव : शेतकऱ्यांप्रती सरकार असंवदेनशील; आमदार एकनाथ खडसेंची टीका
The post धुळे : अन्.... दहा वर्षापासून बंद असलेला पाट खळखळ वाहू लागला appeared first on पुढारी.