धुळे : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी जन्मठेप ठोठावली आहे. अत्याचारावेळी चार वर्षांची असलेल्या या बालिकेची सुनावणीवेळची साक्ष आणि जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांचा युक्तिवाद या प्रकरणांमध्ये महत्त्वाचा ठरला.
धुळे तालुक्यातील एका खेड्यात 19 नोव्हेंबर 2018 मध्ये हा प्रकार घडला होता. या गावातील विक्रम मोरे याने चार वर्षांची बालिका अंगणात खेळत असताना तिला शेतात नेत अत्याचार केले होते. मोरे याच्याविरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तंवर यांनी महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयाच्या समोर सादर केले. यात पीडितेसह फिर्यादी आणि अन्य महत्त्वाच्या साक्षीदारांसह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक नंदा पाटील यांची साक्ष घेण्यात आली. सत्र न्यायाधीश यास्मिन देशमुख यांनी विक्रम मोरे याला या प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपी मोरेला एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून, यातील ५० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा :
The post धुळे : अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.