
धुळे : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने मालेगाव येथील एका तरुणाच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मालेगाव तालुका पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
मालेगाव तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळ्याच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब निदर्शनास आल्याने तिला प्रसूतीसाठी धुळ्यात दाखल करण्यात आले. तिच्या पोटात नऊ महिन्याचे बाळ असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना समजल्याने त्यांनी शस्त्रक्रिया करून या बालकाला जन्म दिला आहे. नुकतेच जन्मलेले बाळ हे अतिदक्षता विभागात असून अल्पवयीन मुलीची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने धुळे शहर पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आल्याने त्यांनी तातडीने या घटनेची दखल घेतली. पिडीत मुलीच्या आईची चौकशी केली असता या महिलेने तिच्यावर अत्याचार झाला असल्याची माहिती दिली. सदर महिला मजूर असून ती सकाळपासून मजुरीसाठी बाहेर पडत असे. पिडीतेवर त्याच गावातील चिंग्या नामक तरुणाने अत्याचार केला असल्याची बाब पीडित मुलीच्या आईने सांगितल्याने शहर पोलिसांनी ही माहिती मालेगाव पोलिसांना कळवली. मात्र, मालेगाव तालुका पोलिसांनी या घटनेची वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे धुळे शहर पोलिसांनी संशयित चिंग्या नामक तरुणावर लहान मुलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा मालेगाव तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- Kolhapur : कोल्हापूरातील ‘या’ गावात धार्मिक प्रथेनुसार गाव बंद, व्यवहार ठप्प; जाणून घ्या अनोखी प्रथा
- ऑस्कर विजेत्यांची एमएस धोनीसोबत ग्रेट भेट
- शरद पवारांनी राजीनामा देतो म्हणणं आणि देणं यातला फरक ठाकरेंना समजून सांगितला, फडणवीस यांची बोचरी टीका
The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.