धुळे : आरोग्य विद्यापीठच्या युजी पीजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण दोडामणी यांची निवड

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

येथील जवाहर मेडिकल फांउडेशनचे अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत यु.जी. आणि पी.जी क्लिनिकल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच घोषित करण्यात आली. यामध्ये जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अण्णासाहेब चुडामण पाटील मेमोरियल दंत महाविद्यालय, मोराणे धुळे येथील प्राचार्य डॉ. अरुण दोडामणी यांची पदवी आणि पदव्युत्तर क्लिनिकल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यु.जी. आणि पी.जी अभ्यास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ए. सी. पी. एम. डेंटल कॉलेज, मोराणे प्र. ल चे प्राध्यापक डॉ. विरेंद्र केरुडी यांचीही सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत यु.जी. आणि पी.जी क्लिनिकल अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे भारतीय दंत परिषदेचे जेष्ठ कार्यकारी सदस्य डॉ. राहुल हेगडे, इंडियन असोसिएशन ऑफ कंझर्व्हेटीव्ह दंत चिकित्साचे माजी अध्यक्ष डॉ विभा हेगडे, जवाहर मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष आमदार कुणाल पाटील, सचिव डॉ. ममता पाटील, सहसचिव श्रीमती संगीता पाटील यांनी स्वागत केले आहे.

डॉ. अरुण दोडामणी यांचा परिचय असा…

डॉ. दोडामणी हे भारतीय दंत परिषदेचे सदस्य असून प्रवरा वैद्यकीय विद्यापीठ लोणी आणि कृष्णा विश्व विद्यापीठ कराडचे शैक्षणिक परिषदेचे सदस्य आहेत. तसेच ते ललित नारायण विद्यापीठ दरभंगा, बिहार सरकारचे आजीवन अधिसभा सदस्य असून इंडियन असोसिएशन पब्लिक हेल्थ डेन्टीस्टचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान डॉ. दोडामणी यांनी यापूर्वी सन 2012 ते 2017 या कालावधीत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच दंत शिक्षणाच्या विकासासाठी प्रचंड मोठे योगदान आहे.

हेही वाचा:

The post धुळे : आरोग्य विद्यापीठच्या युजी पीजी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुण दोडामणी यांची निवड appeared first on पुढारी.