Site icon

धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे बाजार समिती निवडणूकीच्या विजयात गुंतून न जाता सत्काराचे हार-तुरे झुगारत धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील जापी, शिरधाणे, न्याहळोद शिवारात जाऊन पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा केला. दरम्यान आ. कुणाल पाटील यांनी या आधी दि. 29 एप्रिल रोजी मुकटी परिसरात जाऊन नुकसानीची पहाणी केली व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची भेटही घेतली.

धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचा निकाल घोषीत झाला. या निवडणूकीत आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व जागांवर विजयी मिळवित काँग्रेस महाविकास आघाडीने झेंडा फडकविला. विजयाचे हार-तुरे झुगारत आ. कुणाल पाटील हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी जापी, शिरडाणे, न्याहळोद, विश्‍वनाथ या परिसरात पोहचले. त्यामुळे अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधाराचा एक सुखद धक्का बसला. आ. पाटील हे शिवारात नुकसानीची पहाणी करण्यासाठी आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.

यावेळी आ. पाटील यांनी मका, कांदा, लिंबू, बाजरी, ज्वारी, भाजीपाला या नुकसान झालेल्या पिकांची पहाणी केली. वादळ-वारा, अवकाळी पावसामुळे धुळे तालुक्यात विविध भागात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ. कुणाल पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी दुरध्वनीव्दारे संपर्क करुन अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा त्वरीत पंचनामा करुन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. पहाणी दरम्यान आ. पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांशी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करीत सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर निश्‍चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. यावेळी आ. पाटील यांच्यासोबत जापीचे माजी सरपंच दिपक गुजर, शांतीलाल पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील, मुरलीधर पाटील, युवक काँग्रेसचे संदिप पाटील, अरविंद पाटील, आनंदा पाटील, अनिल पाटील, माजी ग्रा.प. सदस्य गणेश पाटील, हरीकृष्ण गुजर, सेवा सोसायटी चेअरमन आकाश गुजर, धनराज गुजर, शिवाजी गुजर, गफुर शेख, आला वंजारी, दिपक पाटील, नितीन पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी appeared first on पुढारी.

Exit mobile version