
धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील फोफादे शिवारात सुझलॉन कंपनीच्या बंद टॉवरमधून बॅटरीसह कॉपर वायर चोरणाऱ्या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या चौघांविरोधात सुरक्षा सुपरवायझरने दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुझलॉन कंपनीचे फोफादे शिवारात टॉवर (क्र. जे -७) आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तेथे चोरी होत असल्याची खबर मिळाल्याने झोनल सुपरवायझर शनेश्वर चव्हाण यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार गस्ती पथकावरील बबल्या धनराज चव्हाण, रामदास झामरू चव्हाण व विजय नागो पवार या तिघांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. विनोद भुऱ्या भवरे (रा. लोणखेडी, साक्री), अजय रमेश भवरे (रा. आखाडे, ता. साक्री), छोटू मन्साराम सोनवणे (रा. जैताणे भीलाटी, साक्री) व काशिनाथ अर्जुन ठाकरे (रा. जामदा, ता. साक्री) हे चौघे तेथे बॅटरीसह कॉपर वायरची चोरी करताना आढळून आले. याप्रकरणी बबल्या चव्हाण याने पोलिसांत फिर्याद दिल्याने चौघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करित आहे.
हेही वाचा :
- पिंपरी : दुरुस्तीसाठी ‘पॅच’ लावल्याने रस्त्यांवर खड्डे
- नगर : टाकळी ढोकेश्वरमध्ये रंगणार तिरंगी लढत!
- Parliament Monsoon Session : लोकसभा, राज्यसभेच कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
The post धुळे : कंपनीच्या बंद टॉवरमध्ये चोरी करताना चौघांना रंगेहाथ पकडले appeared first on पुढारी.