Site icon

धुळे : कर्जाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तरुण पोलिसांच्या ताब्यात

धुळे ; पुढारी वृत्तसेवा : कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला धुळ्यात बोलवून तिच्यावर अत्याचार करून तिला पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषता या महिलेवर अत्याचार करणारा तरुण हा तिच्या जवळचा नातेवाईक असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे.

संबंधित पिढीतेचे सोनगीर येथे माहेर असून तिचा पती व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये खटके उडत असल्याने पीडिता ही सोनगीर येथेच राहत होती. व्यसनाधीन असणाऱ्या तरुणाला पूर्वपदावर आणण्यासाठी कर्ज काढून देण्याचे अमिष त्याच्याच जवळच्या नातेवाईकाने या पिढीतेला दाखवले. यानंतर संबंधित पीडीतेला त्याने धुळे शहराजवळ असणाऱ्या पारोळा रस्त्यालगतच्या कृषी महाविद्यालयाजवळ बोलवले. यानंतर त्याने या भागात असणाऱ्या नाल्याच्या परिसरात या पिढीतेला नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेची माहिती तिने कोणालाही देऊ नये, यासाठी त्याने हात पाय बांधून दुचाकी मधील पेट्रोल काढून तिला पेटवून दिले. यानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. हा प्रकार कृषी महाविद्यालयातील रखवालदाराच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने पोलीस दलाशी संपर्क करून एक महिला अत्यवस्थ अवस्थेत असल्याची माहिती दिली. त्यानुसार उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी ,आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या या महिलेला तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आले. गंभीर भाजलेल्या या महिलेने तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार आझाद नगर पोलीस ठाण्यात भादवि कलम 376, 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात आरोपी बाळू यादव चंद्र याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.

The post धुळे : कर्जाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; तरुण पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version