धुळे : खळवाडीतून ३ लाखांच्या शेती अवजारांची चोरी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील मलांजन येथील खळवाडीतून शेती अवजारांसह सुमारे ३ लाखांच्या मुद्देमालाची धाडसी चोरी करण्यात आली. रोटावेटर, ट्रेलर, ट्रॅक्टरची बॅटरी, पिस्टन पंप आणि चार जाळीचे बंडल चोरट्यानी लंपास केले. या प्रकरणी देविदास उत्तम सोनवणे (मु. पो. मलांजन ता. साक्री. जि.धुळे) यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेनंतर साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख, सरपंच परीक्षित सोनवणे, पोलीस पाटील किशोर मराठे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास पीएसआय अहिरे करत आहेत.

साक्री तालुक्यात शेतीमालाच्या व कृषी अवजारांच्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यात ही तिसरी मोठी धाडसी चोरी आहे. पोलिसांनी चोरट्य़ांना तत्काळ अटक करून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : खळवाडीतून ३ लाखांच्या शेती अवजारांची चोरी appeared first on पुढारी.