पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील दहिवेल रस्त्यावरील कांद्याच्या चाळीतून चोरट्यांनी मध्यरात्री 30 क्विंटल सोयाबीन लांबवला. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. सामोडे येथील भूषण शिवाजी शिंदे यांचे गावालगत शेत आहे. या ठिकाणी असलेल्या कांद्याच्या चाळीत सुरेश विश्वासराव शिंदे यांनी 30 क्विंटल सोयाबीन ठेवले होते. शिंदे सकाळी शेतात गेले असता कांदा चाळीत गेले तेव्हा चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी कांदा चाळीच्या दरवाज्याला असलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चाळीच्या मागील दरवाज्याला असलेले कुलूप तोडले. या ठिकाणी दहा दिवसापूर्वी मळणी करून ठेवलेल्या सोयाबीनला समाधानकारक भाव मिळेल या आशेवर सुरेश शिंदे यांनी 30 क्विंटल सोयाबीन ठेवले होते. त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात माहिती दिली. सामोडे परिसरात दिवसाआड चोरीच्या घटना घडत आहेत तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सामोडेसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा :
- Nagar News : कत्तलीसाठी जाणार्या जनावरांची सुटका
- जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी महालपाटणे येथे साखळी उपोषण
- Dharma Rao Baba Atram : आम्हालाही वाटते, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत- धर्मरावबाबा आत्राम
The post धुळे : चोरट्यांचा दीड लाखांच्या सोयाबीनवर डल्ला appeared first on पुढारी.