धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू

मृतदेह आढळला,www.pudhari.news

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील छावडी गावात एका १९ वर्षीय विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मखन गोजु पांढरे यांनी त्यांची पत्नी संगिता मखन पांढरे हिच्या काकास फोनद्वारे तुमची पुतणी संगिता ही वाड्यावर असताना पाणी घ्यायला गेली. मात्र, ती घरी परतली नाही, तिचा सर्वत्र शोध घेतल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा चुलत भाऊ छावडी गावात दाखल झाला. दरम्यान, संजू पाटील या शेतकऱ्याच्या विहिरीत हंडा व पायातील चपला पाण्यावर तरंगताना दिसले. त्यानंतर नागरिकांनी विहिरीतील पाणी उपसून संगिताचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : छावडी येथे विवाहितेचा विहिरीत पडून मृत्यू appeared first on पुढारी.