धुळे : ठाकरे गटाच्यावतीने महागाईच्या होळीचे दहन

धुळे: पुढारी वृत्तसेवा : जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित बिघडले असून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रूपयांची वाढ केली आहे. केंद्र सरकारचे वाढत्या महागाईवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. याच्या निषेधार्थ आज (दि.६) धुळे शहरातील जुनी महापालिका चौकात ठाकरे गटाच्या वतीने महागाईची होळी पेटविण्यात आली.

या प्रसंगी केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील, ङॉ.सुशील महाजन, भरत मोरे, मच्छिंद्र निकम, संदिप सुर्यवंशी, विनोद जगताप, आण्णा फुलपगारे, संजय जवराज, महादु गवळी, राजेंद्र ढवळे, छोटुभ माळी, कैलास मराठे, अनिल शिरसाठ, प्रकाश शिंदे, अमोल ठाकूर, हरिष माळी, कुणाल कानकाटे, सिध्दार्थ करनकाळ, संजय पाटील, जवाहर पाटील, दिनेश पाटील, प्रविण साळवे, सुनिल पाटील, शुभम रणधीर, वैभव पाटील, नितीन जडे, अजय चौधरी, सागर हिरे, लक्ष्मण बोरसे, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

The post धुळे : ठाकरे गटाच्यावतीने महागाईच्या होळीचे दहन appeared first on पुढारी.