धुळे : पुढारी वृत्तसेवा; नगाव येथील गंगामाई एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात नुकतेच निवड झालेल्या धुळे ग्रामीणचे भाजप नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचा खा. सुभाष भामरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील नगाव येथील गंगामाई एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये भाजप पदधिकार्यांचा स्नेह भेट कार्यक्रमाचे धुळे तालुका निवडणूक प्रमुख तथा जि प सदस्य राघवेंद्र भदाणे यांनी आयोजन केले होते. या कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे पूर्व व पश्चिम क्षेत्रातील ग्रामीणचे भाजप नवनिर्वाचित पदधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थित पदधिकार्यांचा खा सुभाष भामरे यांनी सत्कार करून नियुक्ती पत्र वाटप केले. जबाबदारी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा अरविंद जाधव, संजय शर्मा, किशोर संघवी, चेअरमन रामदादा भदाणे, रामकृष्ण खलाणे, आशुतोष पाटील, शंकर खलाणे, जि प सदस्य संग्राम पाटील, किशोर हालोर मंचावर उपस्थित होते.
आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी धुळे तालुका पश्चिमचे अधक्ष्य रितेश परदेशी, सरचिटणीस राजेंद्र भामरे, छोटू मासुळे, शरद पाटील, उपाध्यक्ष रोहिणी पाटील, पराग देशमुख, ज्योती सूर्यवंशी, शांतीलाल सासके, चिटणीस संदीप पाटील, दिव्यम पाटील, प्रवीण जाधव व उपस्थित कार्यकारणी सदस्यांचा सत्कारा सोबत धुळे तालुका पूर्वचे अध्यक्ष देवेंद्र पाटील, सरचिटणीस श्याम बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, अविनाश पाटील, उपाध्क्ष्य प्रवीण पवार, नागराज पाटील, अरविंद रणदिवे, रवींद्र पाटील, बापू मराठे, मोहन भदाणे, सखाराम पाटील, चिटणीस नरेंद्र चौधरी, मनोहर पाटील, अनिल पोतदार, प्रकाश गुजर, संजय नवसरे, कोषाध्यक्ष सुनील बोरसे व उपस्थित पूर्व कार्यकारणी सदस्यांचा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप धुळे तालुका निवडणूक प्रमुख राम भदाणे यांनी केले. दरम्यान प्रा. अरविंद जाधव व बापू खलाणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन देवेंद्र पाटील यांनी केले तर आभार संदीप धिवरे यांची केले.
हेही वाचा :
- सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली : नाना पटोले
- Pimpri News : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
- Pimpri News : एसटीत ऑनलाईन सुविधेअभावी प्रवाशांची गैरसोय
The post धुळे तालुका भाजप नवनिर्वाचित पदधिकाऱ्यांचा सत्कार appeared first on पुढारी.