धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा : सामोडे येथील ग्रामपंचायतीचे लिपिक भरत भिला साळुंखे याला नमुना नंबर आठ दप्तरात फेरफार करत तहसील कार्यालयाच्या नियोजीत भूखंडावर गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.  भरत साळुंखे याला शासकीय वसुली व पाणी वाटप कामाची नेमणूक केली होती.

त्याने आपल्या लिपिक पदाचा गैरवापर करत सामोडे ग्रामपंचायतीची कुठलीही पूर्वसंमती न घेता नमुना नंबर आठमध्ये स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर फेरफार केल्याचा आणि सही, शिक्का मारल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी  लिपिक भरत साळुंखे (वय ३७, रा.घोडमाळ सामोडे ) या कर्मचाऱ्याविरुद्ध तत्कालीन ग्रामविकास अधिकारी बाजीराव जगताप यांनी त्याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती.

हेही वाचलंत का?

The post धुळे : दप्तरामध्ये फेरफार केल्याने ग्रामपंचायत लिपिकास अटक appeared first on पुढारी.