धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

शस्त्र जमा करण्याचे आवाहन, www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता धुळे जिल्ह्यात लागू झालेली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्रे ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनला जमा करावीत. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणुक मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पडावी. सार्वजनिक उपद्रव, नुकसान, जिवितास व आरोग्यास तसेच सुरक्षितपणास धोका निर्माण होऊ नये आणि मतदारात भय, दहशत निर्माण होवू नये यासाठी समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांचेकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खाजगी सुरक्षारक्षक यांना त्यांच्याकडे असलेले शस्त्र जमा करण्यास सुट देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ज्या शस्त्र परवाना धारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणार नाही, अशा शस्त्र परवाना धारकांनी 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्हादंडाधिकारी तथा समिती अध्यक्ष यांचेकडे (गृह शाखेत) स्वयंस्पष्ट कारणासह स्वतंत्र अर्ज करावा. प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरणनिहाय निर्णय घेईल, असे समितीच्या बैठकीत ठरल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय गायकवाड यांनी कळविले आहे.

हेही वाचा ; 

The post धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश appeared first on पुढारी.