
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, दि. 7 अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी साक्री तालुक्यातील टिटाणे, खोरी, पेटले, दुसाणे या भागात जाऊन पाहणी केली.
साक्री तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन यांनी आज मंगळवार रोजी या भागाचा दौरा केला. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, खासदार डॉ. हीना गावित, आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. डी. मालपुरे, तहसीलदार चव्हाणके यांच्यासह जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री महाजन यांनी अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त भागाची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल, असेही पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.
हेही वाचा:
- भाजपाच्या जाळ्यात अडकू नका, दरडोई उत्पन्नाची आकडेवारी दिशाभूल करणारी – खर्गे
- छत्रपती संभाजीनगर : चोरीचे ट्रक स्क्रॅप करणाऱ्या टोळीप्रमुखाला पुण्यातून अटक
- पुणे : अखेर ‘त्या’ प्रकरणात नाझिरकरांसह अन्य १२ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
The post धुळे : पालकमंत्री गिरीश महाजन यांची गारपीटग्रस्त भागाची पाहणी appeared first on पुढारी.