धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार

लाटीपाडा धरण,www.pudhari.news

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : साकी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात पांझरा नदीच्या उगम स्थानावर दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्यावरून पाणी वाहत आहे. पिंपळनेर व परिसरात अद्यापही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. केवळ अत्यल्प स्वरूपाचा पाऊस असून तो पिकांना जीवदान ठरत आहे. मात्र पांझरा नदीच्या उगमस्थानी पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, उमरपाटा या भागात दोन ते तीन दिवसांपासून संततधार झालेल्या पावसामुळे पांझरा नदीवरील लाटीपाडा आज सकाळी दहा वाजेला पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहु लागले.

हे धरण ओव्हरफ्लो झाल्याने पिंपळनेर परिसरातील रब्बी पिकासोबतच व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.  पिंपळनेर परिसरातील जामखेली नदीवरील धरण, कान नदीवरील मालगाव धरण, काबरा खडक ,एमआय टैंक पूर्ण क्षमतेने (दि. ११) रोजी रात्री भरले आहेत. पश्चिम पट्ट्यातील लहान-मोठे पाझर तलाव जलाशय देखील पुर्ण भरले आहेत.

साक्री तालुक्यासाठी पांझरा अर्थात लाटीपाडा मध्यम प्रकल्प गेल्यावर्षी १९ ऑगस्टला पूर्ण भरला होता. यंदा जुलैमध्येच भरल्याने पांझरा नदीला पूर आला असून नदी शेजारील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  सद्य:स्थितीत प्रकल्पाच्या सांडव्यावरून ३६९ क्युसेक विसर्ग होतो आहे. प्रकल्पाला डावा आणि उजवा कालवा असल्याने परिसरातील त्याचा अनेक गावांना लाभ होतो.

हेही वाचा :

The post धुळे : पिंपळनेरचे लाटीपाडा धरण ओव्हरफ्लो ; पश्चिम पट्टयात संततधार appeared first on पुढारी.