
पिंपळनेर (ता.साक्री)
संत निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर शाखेच्या वतीने येथील पांझरा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर ब्रँचचे मुखी व ज्ञानप्रचारक जगदीश ओझरकर उपस्थित होते.
संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन तर्फे देशभरात ११०० पेक्षा जास्त ठिकाणी आज “प्रोजेक्ट अमृत”उपक्रमांतर्गत ‘स्वच्छ जल-स्वच्छ मन’ हे अभियान राबविण्यात आले. पिंपळनेर येथे आज सकाळी ८ ते १२ या वेळेत दंमडकेश्वर लाँन्स जवळील पांझरा नदीच्या पात्रातील व काठावरील प्लास्टिक, घनकचरा जमा केला. जलपर्णी, काटेरी झुडपे व कच-याची दोन ट्रॅक्टर घाण निरंकारी सेवादलाच्या पुरुष व महिला भक्तांनी यावेळी जमा करुन त्याची विल्हेवाट लावली. निरंकारी भक्तांच्या या सेवाकार्याची यावेळी स्थानिक ग्रामस्थ, विविध अधिकारी व पदाधिकार्यांनी प्रशंसा केली.
हेही वाचा :
- Virat Kohli : अनुष्का माझी मोठी प्रेरणा, तिने केलेल्या त्यागापुढे मी काहीच नाही
- नागरी नियोजन अन् शहरी प्रशासनाचा शहर विकासात मोठा वाटा- पीएम मोदी
The post धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता appeared first on पुढारी.