धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : येथील माऊलीनगर व मंगलमूर्तीनगरमध्ये एकाच रात्री दोन बंद घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागदागिने व शिवण्यासाठी आणलेले पंधरा-वीस शर्ट व पॅन्टचे कापड, रोख रक्कम असा अंदाजे ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या आठवड्यातील चोरीची ही पाचवी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

येथील सटाणा रस्त्याला लागून असलेली नव्या वसाहतीमधील मंगलमूर्तीनगरमध्ये राहणारे ग्रामपंचायत सदस्य मीना ठाकरे बाहेरगावी बाहेरगावी गेल्या होत्या. तीन दिवसांपासून घर बंद असल्याच्या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडले. घरातील कपाटात ठेवलेल्या अंदाजे ५ तोळे सोन्याचे दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या. तर वरच्या मजल्यावर असलेले कपाट फोडून वस्तू व समान अस्ताव्यस्त फेकून दिले. यात ठाकरे यांच्या सुनेची अंगठी, मुलाची सोन्याची अंगठी व सोन्याची चेन, मीना ठाकरे यांची मंगलपोत तसेच पॅन्ट शर्टचे कापड असा अंदाजे अडीच लाख व रोख ५० हजार असा एकूण पाच लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. पोपट ठाकरे हे कोकणगाव येथून दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.

दरम्यान, दुसऱ्या ठिकाणी माऊलीनगर मधील लताबाई अहिरराव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील ७५ हजार रोख व दीड तोळे सोने असा एकूण दीड लाखाचा ऐवज लांबविला.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे: पिंपळनेर शहरात घरफोडीचे सत्र सुरूच; दोन ठिकाणी चोरी appeared first on पुढारी.