धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने

पोलीस

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये उमेदवारांना एकाहून अधिक जिल्ह्यांच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी, या मागणीसाठी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजीसह निदर्शने केली. महाराष्ट्र पोलिस विभागातर्फे महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल, राज्य राखीव दलाचे कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी सुमारे 18 हजारहून अधिक जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या पोलिस भरतीत मात्र कोणत्याही एका पदासाठी एकावेळी एकाच ठिकाणी उमेदवाराला अर्ज करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही सक्ती अन्यायकारक असून, ती रद्द करून एकाहून अधिक ठिकाणी उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची संधी मिळावी, अशी मागणी महेंद्र शिरसाठ, हेमंत चव्हाण, वैभव भदाणे, सचिन कदम, संकेत गवळी, शिव ठाकरे, दीपमाला पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : पोलिस भरतीकरता अन्य जिल्ह्यांतही अर्ज करण्याची संधी मिळावी; राष्ट्रवादीची निदर्शने appeared first on पुढारी.