धुळे : बँकेच्या वसुली एजंटकडून पैशांची लूट करणाऱ्या सहा जणांना बेड्या

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : बँक एजंटच्या दुचाकीला कारने धडक देऊन त्याच्याकडील रोकड लूट करणाऱ्या सहा जणांना बेड्या ठोकण्यात साक्री पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी साक्री तालुक्यातील असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असल्याची माहिती आज (दि.२६) पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे. दरम्यान या कारवाईमुळे साक्री पोलिसांना दहा हजाराचे पारितोषिक जाहीर केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

साक्री शहरात राहणारे प्रमोद टाटिया हे हस्ती बँकेच्या साक्री शाखेत एजंट म्हणून काम करतात. दोन दिवसांपूर्वी टाटिया हे बँकेच्या संपूर्ण दिवसाची वसुली करून दुचाकीवरून घरी जात आहे. यावेळी चारचाकी मधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

यानंतर हे वाहन पेरेजपूर रस्त्याकडे निघून गेली. वाहनाने धडक दिल्यामुळे टाटिया रस्त्यावर पडले. त्यामुळे या घटनास्थळावरच बाकावर बसलेल्या तरुणांनी मदत करण्याच्या बहाण्याने टाटिया यांच्या हातातील पिशवी घेत पलायन केले. यानंतर टाटिया यांनी साक्री पोलीस ठाण्तया या संदर्भातील माहिती दिली.

त्यानुसार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोतीराम निकम यांनी पथके तयार केली आहेत. या पथकाने योगेश विजय पवार ,गौरव विजय पवार तसेच गणेश राजेंद्र देसले, दीपक पवार ,दावल अरुण भवरे ,संपत उर्फ संप्या अशोक मालशे यांना ताब्यात घेतले आहे.

या तरुणांची चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून पाच लाख रुपये किमतीची जी. जे. १५ ए.डी. ५५०१ क्रमांकाची चारचाकी तसेच एक लाख दहा हजार रुपये किंमतीची एम. एच. ०४ इ. डब्ल्यू. ४६७४ क्रमांकाची दुचाकी तसेच बँकेच्या वसुलीसाठी वापरले जाणारे मशीन, पाच मोबाईल संच असा आठ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी गुन्ह्याचा तपास केल्याबद्दल साक्री पोलिसांना दहा हजार रुपयांचे बक्षीस दिल्याची माहिती दिली.

हेही वाचा :

The post धुळे : बँकेच्या वसुली एजंटकडून पैशांची लूट करणाऱ्या सहा जणांना बेड्या appeared first on पुढारी.