Site icon

धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची ‘मन की बात’ ला पसंती

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज शंभरावा ‘मन की बात’ कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने महापौर प्रतिभा चौधरी यांनी धुळ्याच्या देवपूर परिसरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. यात नागरिकांची आरोग्याची तपासणी देखील करण्यात आली. विशेषत: देवपूर परिसरात आज रविवार (दि.30) विवाहसोहळा असल्याने या नव-वधू आणि वराने बोहोल्यावर चढण्यापूर्वी ‘मन की बात’ कार्यक्रमाला पसंती देत लाभ घेतला. त्यामुळे त्यांचे सर्वच उपस्थितांनी अभिनंदन व कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०० व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन महापौर प्रतिभा चौधरी यांनी केले. पंतप्रधान यांनी सुरू केलेला ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सलग १०० भाग प्रसारीत झाले असून देशातील जनतेला उद्देशून माहितीपर सादर केलेला हा एकमेव उपक्रम आहे. धुळयातील सर्वसामान्य नागरीकांना या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी मोठया प्रोजेक्टरवर कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने शहरातील नागरीकांसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात नागरीकांचे आरोग्य तपासणी तसेच अनुषंगिक तपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमात भाजपा महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, योगेश्वर पतसंस्था चेअरमन गोपाळ केले, जयहिंद संस्थेचे ॲड. राजन पाटील, शिवाजीराव चौधरी, नितीन सूर्यवंशी, पंकज चौधरी, देवपूर मंडल अध्यक्ष अरुण पवार, ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सागर चौधरी, चंद्रकांत बोरसे, शेखर कुलकर्णी, डॉ. श्रीराम भतवाल, डॉ. योगेश पाटील, संजय देसले, हुकुमचंद जैन, प्रा. शिवाजी बैसाणे, सुधीर बोरसे, डॉ. महेश घुगरी, संजय बोरसे, हेमंत मराठे, प्रा. संजय देवरे, संजीवनी पाटील उपस्थित होते.

बोहोल्यावर चढण्यापूर्वी वधू वरांची मन की बात कार्यक्रमाला हजेरी
विशेषतः आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी नववधू आणि वराने देखील हजेरी लावली. देवपूर परिसरातील जय हिंद कॉलनीमध्ये अभियंता असणारे संदीप पाटील यांच्या लहान भावाचे आज लग्न होते. त्यासाठी वर हेमंत राजेंद्र पाटील व वधू दिपाली यशवंत मगर यांनी बोहल्यावर चढण्याची तयारी केली. मात्र तत्पूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमातील विचार ऐकले. यानंतर त्यांनी विवाह मंडपात हजेरी लावून लग्न सोहळा पार पाडला.यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले.

हेही वाचा:

The post धुळे : बोहल्यावर चढण्यापूर्वी नववधू-वरांची 'मन की बात' ला पसंती appeared first on पुढारी.

Exit mobile version