धुळे : भगवान विमलनाथ यांची मूर्ती अखेर जैन धर्मशाळेत स्थलांतरित

भगवान विमलनाथ,www.pudhari.news

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील बळसाणे येथे काल रात्री २ वाजेच्या सुमारास श्री. विमलनाथ भगवान यांची मूर्ती गावाला लागूनच असलेल्या नूतन जैन धर्मशाळेत स्थलांरित करण्यात आली. आज सकाळी ९ वाजता मूर्तीची स्थापना करण्यात आली. शितलनाथ भगवान ट्रस्टकडून गेल्या ८ महिन्यांपासून श्री. विमलनाथ भगवान यांची मूर्ती स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न सुरु होते.

गावातील काही नागरिकांचा विरोध पाहता दिवसभर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काल रात्री उशिरापर्यंत ट्रस्ट व गावकऱ्यांमध्ये बैठक झाली. परंतु बैठकीत तोडगा निघू शकत नसल्याने रात्री गावात शांतता निर्माण झाल्यानंतर आचार्य भगवंत युगसुंदर सुरीश्वरजी महाराज, साध्वी श्रीजी परमपूज्य संवेगनिधी यांच्या हस्ते पूजाविधि करून प्रशासनाने विमलनाथ भगवानांची मूर्ती शितलनाथ भगवान संस्थानकडे सुपूर्द केली. या घटनेवर साक्रीच्या तहसीलदार आशा गांगुर्डे, निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड लक्ष ठेवून होते. यासाठी एक पोलिस निरीक्षक, तीन उपनिरीक्षक, शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता. प्रशासकीय यंत्रणेने यशस्वीरित्या कायदा सुव्यवस्था हाताळली.

हेही वाचा :

The post धुळे : भगवान विमलनाथ यांची मूर्ती अखेर जैन धर्मशाळेत स्थलांतरित appeared first on पुढारी.