
पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा दिनानिमित्त भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 117 व्या जयंतीचे पूजन क्रीडा प्रशिक्षक गांगुर्डे, पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक एच. के. चौरे, प्राचार्य एम. ए. बिरारीस, उपप्राचार्य एम. डी. माळी, प्रा. के. यु. कोठावदे यांच्या हस्ते क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. विविध क्रीडा क्षेत्रातील साहित्याचे पूजनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पटांगणावर उपस्थित होते. प्राध्यापक एन. डब्ल्यू. वाघ यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
हेही वाचा:
- कॅनडातील रस्त्याला ए. आर. रेहमानचे नाव
- राऊतला म्हणणे मांडण्याची नोटीस; वाघोलीतील नियमबाह्य 24 दस्तनोंदणीचे प्रकरण
- नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव संमेलनाचे उद्घाटन
The post धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी appeared first on पुढारी.