
पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले व सायगाव ता. चाळीसगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी सक्क्वॉइन कॅडेट कॅप्टन प्रथम उर्फ यश गोरख महाले (22) यास पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील एनडीए राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणादरम्यान डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. काल (दि.18) पहाटे 5.10 वाजता दक्षिण कमांड सैनिक हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या पार्थिव शरीरावर चाळीसगाव तालुक्यातील पिलखोडनजीक असलेले सायगाव येथे मूळ गावी आज (दि.19) सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तत्पूर्वी त्याचे पार्थिव पिंपळनेर येथील महात्मा फुले कॉलनीतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते.
खडकवासला येथील एनडीएच्या प्रशिक्षण केंद्रात लेफ्टनंट कर्नल पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पुढील महिन्यात लेफ्टनंट कर्नल म्हणून रूजू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रथम (यश)गोरख महाले (22) हा बॉक्सिंग गेम्स इतर अॅक्टिव्हिटी करताना मुका मार लागल्याने जखमी झाला होता. पुणे येथील दवाखान्यात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपळनेर शहरात व चाळीसगाव तालुक्यातील सायगाव, भांदुर्डे येथे शोककळा पसरली आहे. रात्री प्रथम महाले याचे पार्थिव पिंपळनेर येथील महात्मा फुले कॉलनीतील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. आज (दि.19) सकाळी 9 वाजता सायगाव येथे शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आईवडिलांचा एकुलता एक मुलगा
प्रथम महाले हा माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गोरख महाले व उपशिक्षिका एस.एस.शेवाळे- महाले यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच त्याचे लेफ्टनंट कर्नल म्हणून रूजू होण्याचे स्वप्न होते. त्याने पहिली ते चौथीपर्यंत पिंपळनेर येथे शिक्षण घेतले. सातारा येथील सैनिकी शाळेत पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर लेफ्टनंट कर्नल या पदासाठी परीक्षा देऊन तो विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. लेफ्टनंट कर्नल या पदासाठी एनडीए प्रशिक्षण केंद्रातून चार वर्षोंचे प्रशिक्षण पूर्ण केले होते, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.
हेही वाचा :
- Bawankule vs Pawar : “दहशतवाद कुठलाही असो…” : बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
- Lalit Patil Drug Case : ससूननंतर ललितचा पंचवटीत मुक्काम, महिलेकडून २५ लाख घेऊन झाला पसार
The post धुळे : भावी लेफ्टनंट कर्नलचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.