धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद

साक्री

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा : मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज (दि.२८) आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या साक्री बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

साक्रीतील आदिवासी संघटनांनी मणिपुरातील आदिवासींना समर्थन देण्यासाठी साक्री बंदची हाक दिली. बाजारपेठेसह सकाळपासून संपूर्ण साक्री शहरात शुकशुकाट दिसून आला. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बंदमध्ये आदिवासी कोकणी समाज संघटना, रावण साम्राज्य ग्रुप, आदिवासी परिवार, संकल्प व्यापारी युवा जागृती संघटना, साक्री व्यापारी असोसिएशन, ठाकरे गट, अल्पसंख्याक विकास मंडळ, एकलव्य भिल्ल संघटना, स्त्री शक्ती प्रतिष्ठान आदी संघटनांनी सहभाग घेतला होता. तर या बंदला प्रहार जनशक्ती पक्ष, दिव्यांग संघटना, साक्री तालुका पत्रकार संघाने पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी डीवायएसपी साजन सोनवणे, साक्री शहराचे पीआय मोतीराम निकम, पीएसआय कोळी, शांतीलाल पाटील, रामपाल अहिर यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

The post धुळे: मणिपूर घटनेच्या निषेधार्थ साक्री शहरात कडकडीत बंद appeared first on पुढारी.