धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौरपदावर आज ( दि.१९) भाजपाचे प्रदीप करपे यांची अधिकृतपणे निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. शहरातील पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार असल्याची प्रतिक्रिया या वेळेस त्यांनी व्यक्त केली. धुळे येथील महापौर पदावर आठ महिन्यांपूर्वी प्रदीप करपे यांना संधी मिळाली होती. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यामुळे करपे यांना अवघ्या आठ महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा आरक्षण काढण्यात आल्याने महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण उमेदवारासाठी निघाले. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी पुन्हा सर्वसाधारण आरक्षणाच्या जागेवर महापौर पदावर प्रदीप करपे यांनाच संधी देण्याचे निश्चित केले. त्यामुळे त्यांनी एकमेव अर्ज भरला. विरोधी गटाकडून देखील अर्ज आला नसल्यामुळे करपे यांची निवड बिनविरोध मानली जात होती.
दरम्यान, आज महानगरपालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशेष सभा घेण्यात आली. या सभेत महापौर पदावर करपे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी स्थायी समितीचे सभापती शितलकुमार नवले तसेच भाजपाचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, नगरसेवक हिरामण गवळी यांच्यासह भाजपचे नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महापौर करपे यांनी सांगितले की, धुळे शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे रस्ते आणि गटारींची समस्या देखील सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे युतीसाठी तयार होते, पण संजय राऊतांनी खोडा घातला https://t.co/LyC4MUaeeV #UddhavThackeray #SanjayRaut #EknathShinde #Shivsena #ShivSenaMP #BJP #DevendraFadnavis #RahulShewale
— Pudhari (@pudharionline) July 19, 2022
हेही वाचलंत का ?
- Booster Dose : दुसरा बुस्टर डोस ओमायक्रॉन विरोधात अत्यंत प्रभावी : अमेरिकेतील संशोधन
- Disha Patani : मोकळ्या केसांसोबत ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिशा एकदम हॉट
- Priyanka -Nick : निक-प्रियांकाचे रोमँटिक अंदाजात बर्थ डे सेलिब्रेशन
The post धुळे : महापौर पदी प्रदीप करपे यांची निवड appeared first on पुढारी.