
पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा
वीजबिलाच्या थकबाकीसाठी गेलेल्या महावितरणच्या वसुली पथकाने इलेक्ट्रिक पोलवर टाकलेले आकडे काढल्याचा राग धरून दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बोडकीखडी गावात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन बाळासाहेब गवळी या वायरमनने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी डुक्करझिरे येथील पोलवरील अवैधरीत्या टाकलेले आकडे काढून जप्त करण्यात आले. काम आटोपून कर्मचारी सायंकाळी ५ वाजता दहिवेलच्या रस्त्याने जात असताना त्यांना डुक्करझिरे येथील एका अनोळखी इसमाने अडविले. तसेच नवीन वीज कनेक्शनसाठी काय-काय कागदपत्रे लागतात, अशी विचारणा करत असताना तिथे अजय युवराज देसाई (रा.डुक्करझिरे) व छगन चंदू गायकवाड (रा.बोडकीखडी) हे आले. त्यांनी पथकाला दम देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पोलिसांना दिलेल्या या फिर्यादीवरुन अजय देसाई आणि छगन गायकवाड यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळ्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा तपास आर. आर. जाधव करीत आहेत.
हेही वाचा:
- विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब
- पुणे : डांबरी रस्त्यावर खड्ड्यात माती-मुरमाची मलमपट्टी
- धुळे : सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड
The post धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग appeared first on पुढारी.