
धुळे पुढारी वृत्तसेवा
महावितरणने दाखल केलेल्या ६७ हजार कोटी रुपयांच्या विज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेने विरोध दर्शविला असून या विरोधात नागरिकांनी तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणची मागणी मान्य केल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
विज दरवाढीच्या संदर्भात ग्राहकांनी जागरुक राहणे गरजेचे आहे. तसेच आयोगाने विज दरवाढीचा निर्णय देण्यापूर्वी ग्राहकांचा विचार करावा. विज कंपन्या कशामुळे तोट्यात आहेत याची चौकशी करावी असे आवाहन शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे व हेमंत साळुंखे योनी केले आहे.
महावितरणने ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केल्याने विज ग्राहक मेटाकुटीला येणार आहेत. महावितरणच्या या प्रस्तावावर वीज आयोगाने ग्राहकांकडून सुचना व हरकती मागवल्या आहेत, त्यामुळे नागरिकांनी जागृत राहून या विज दरवाढी विरोधात हरकती दाखल कराव्यायत असे आवाहन धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, हिंमत सावळे, परशुराम देवरे, शानाभाऊ सोनवणे (शिंदखेडा), भरत राजपूत (शिरपूर), जिल्हा समन्वयक कैलास पाटील, किशोर वाघ, डॉ. भरत राजपूत, जिल्हा संघटक भगवान बापूजी करनकाळ, मंगेश पवार, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महानगरप्रमुख धिरज पाटील, डॉ. सुशील महाजन, तालुका प्रमुख नाना वाघ, पंकज मराठे, अमोल सोनवणे, गिरीश देसले, ईश्वर पाटील, अतरसिंग पवार, युवा नेता हरीष माळी, आकाश कोळी, महिला आघाडी च्या हेमलता हेमाडे यांनी केले आहे.
हेही वाचा :
- सोलापूर : विद्यापीठ परीक्षेचा गोंधळ सुरूच
- पहाटेच्या शपथविधीमागे पवारांसह संजय राऊतांचाही हात; संजय शिरसाट यांचा गौप्यस्फोट
- पिंपरी : तळेगावात ई-व्हेईकलचे 4 चार्जिंग स्टेशननगर परिषदेमार्फत शहरात सुविधा
The post धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध appeared first on पुढारी.