
धुळे : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन दिवसापासून आ.कुणाल पाटील यांचा धुळे तालुक्यात अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा सुरु आहे. गावागावात व शेतात जाऊन शेतकर्यांशी चर्चा करीत आहेत. चर्चेदरम्यान आ.पाटील हे शेतकर्यांना धीर देत शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवून देण्याची जबाबदारी माझी असून त्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देतांना सांगितले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची आ.कुणाल पाटील हे धुळे तालुक्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतपिकांची पहाणी करीत आहेत. मंगळवारी (दि.27) गोंदूर शिवारात जाऊन पाहणी दौर्यात त्यांनी विविध गावांमध्येही शेतकर्यांच्या भेटी घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, मका, बाजरी, ज्वारी, कांदा, कडधान्य यासह फळबागायत व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधारमुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने वेचणीला आलेला कापूसही पाण्यात बुडाला, सततच्या पावसामुळे कापसाची बोंडे भिजून कुजल्याने शेतकर्यांच्या कापूस उत्पन्नात घट होवून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्यामुळे खरीपाची इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत. तसेच मुसळधार व संततधार पावसाचा परिणाम होवून धुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील असंख्य घरांची पडझडही झाली आहे. त्यामुळे त्या घरात राहणार्या कुटूंबाच्या संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. परिणामी असंख्य कुटूंब उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्यांशी चर्चा करतांना सांगितले कि, ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्याच्या दुसर्याच दिवशी तालुक्यातील अतिवृष्टीची माहीती घेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी केली. त्यामुळे शेतकर्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे सांगून त्यांनी धीर दिला.
पहाणी दरम्यान आ. पाटील यांच्यासोबत पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे,सुतगिरणी संचालक पंढरीनाथ पाटील, जि.प.सदस्य अरुण पाटील, रावसाहेब पाटील,सचांलक बापू खैरनार, संतोष राजपूत,सागर पाटील, गोंदूर उपसरपंच हिरामण पाटील, ऋषी ठाकरे,सुतगिरणी संचालक रमेश पाटील,दिलीप नारायण पाटील,विश्वास पाटील,संजय पाटील,मधुकर पाटील,दिलीप पाटील, महेश पाटील, प्रशांत पाटील,आर.आर.भदाणे,मोहन पाटील,भटू पाटील,नितीन पाटील, समाधान पाटील,संतोष पाटील,भारत पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- नवरात्रोत्सव : साक्रीत एक अनोखी घटस्थापना
- नगर: लोहगावात 16 गायींच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल
- Navratra 2022 : दुसरा दिवस- राज्यभरातील मंदिरांमध्ये आजची पूजा (Photos)
The post धुळे : माझे नागरिक, माझी जबाबदारी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.