धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशीरा मेथीजवळील अमोल ढाब्यावरजवळ ट्रक, दुचाकी व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला.

या अपघातात हर्षल ठाकूर (रा. महादेवपुरा, दोंडाईचा) हा जागेवर ठार झाला. तर ट्रॅक्टरवरील मेथी येथे राहणारे आनंदसिंग भीमसिंग गिरासे (वय ३२) व सखाराम बाबुराव भिल (वय २५) दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना वैद्यकीय अधिकारी अमोल भामरे व डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी तपासून मृत घोषित केले.

अपघाताची बातमी समजल्यानंतर मेथी परिसरातील नागरिकांनी बचावकार्य सुरू करून तत्काळ जखमींना रुग्णालयात पोहोचवले. या घटनेची माहिती मिळताच शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचलंत का ? 

The post धुळे : मेथी गावाजवळील तिहेरी अपघातात ३ ठार appeared first on पुढारी.