Site icon

धुळे : यशवर्धन कदमबांडे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या ठाकरे गटात दाखल झालेले छत्रपती शाहू महाराजांचे वंशज तथा धुळ्याचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्यात शिवसेना घराघरात पोहोचविण्यासाठी कार्यरत राहील. मोठ्या प्रमाणात तरुणांना वर्गांमध्ये एकजुटपणा आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

धुळे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी आज शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री भास्कर जाधव तसेच खा. विनायक राऊत, युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, धुळे विधानसभा संघटक ललित माळी, प्रियंकाताई जोशी उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्ह्यात संघटना प्रत्येक घरात नेण्यासाठी तरुण फळीची आवश्यकता आहे. त्यामुळे यशवर्धन यांच्यासारख्या तरुणांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवणार असल्याचे संकेत यावेळी उद्धव ठाकरेंनी दिले. यावेळी शिवसेनेचा पर्याय का निवडला असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला असता, यशवर्धन यांनी कोविड काळात केलेल्या कामांमुळे आपण प्रभावीत झालो असल्याचे सांगितले. राज्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कालावधीमध्ये झालेल्या कामांमुळे युवकांना शिवसेनेचे आकर्षण वाढले आहे. आपण या संदर्भात वैयक्तिक निर्णय घेतला असून यात वडील राजवर्धन कदमबांडे यांचा कोणताही निर्णय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री भास्कर जाधव यांनी देखील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

हेही वाचा

The post धुळे : यशवर्धन कदमबांडे यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट appeared first on पुढारी.

Exit mobile version