धुळे येथील  सिंचनाची कामे स्तुतियोग्यच : आमदार सुधीर तांबे

सुधीर तांबे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यात शेतकर्‍यांसाठी सिंचनाची केलेली कामे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत झाली आहे. अशा प्रकारे सर्व क्षेत्रात विकास कामे करण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन आ.सुधीर तांबे यांनी कुसूंबा येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.

कुसूंबा येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कुसूंबा येथील साफसफाई आणि स्वच्छता कर्मचारी महिलांचा साडीचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.सुधीर तांबे यांनी म्हटले की, धुळे तालुक्यातील आ.कुणाल पाटील हे विकासाचा दृष्टीकोन असलेले नेतृत्वा आहे. त्यांनी धुळे तालुक्यात असंख्य तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे. मतदारसंघाचे, तालुक्याचे प्रश्‍न सुटावेत त्यातुन विकास साधला जावा, तसेच विविध क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे प्रश्‍न ते विधानसभेत प्रभावीपणे मांडत असतात. त्यामुळे विकासाबरोबरच सर्वांना न्याय मिळत असतो. आ.कुणाल पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी सिंचनाची केलेली कामे संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत झाली आहे. अशा प्रकारे सर्व क्षेत्रात विकास कामे करण्याचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा असल्याचे आ.तांबे यांनी म्हटले. दरम्यान कुसूंबा येथील मुकबधिर शाळेतील मुलांना विविध प्रकारच्या फळांचे वाटप येथील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केले. कार्यक्रमाला आ.सुधीर तांबे यांच्यासोबत काँग्रेस प्रबोधन समितीचे जिल्हा समन्वयक डॉ.दत्ता परदेशी, मनोहर शिंदे, माजी पं.स.सदस्य डिगंबर परदेशी,रामलाल परदेशी, संजय शिंदे,अश्पाक शेख,प्रा.डी.झेड.परदेशी,डिगंबर पवार, मुश्ताक शेख, रोहिदास साळुंखे, अमोल शिंदे, संदिप परदेशी, तुषार शिंदे, विनोद शिंदे, सनी शिंदे, भटू चौधरी, ज्ञानेश्‍वर शार्दुल, मनिष परदेशी, अक्षय परदेशी, रुपेश जिरे,किशोर शिंदे, भैय्या शिंदे,सुनिल परदेशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post धुळे येथील  सिंचनाची कामे स्तुतियोग्यच : आमदार सुधीर तांबे appeared first on पुढारी.