धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता www.pudhari.news

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातील झाडाझुडपांची साफसफाई करून शेतीला चार दिवसांत पाणी सोडण्यात यावे, तसेच पाटचाऱ्यांचीही साफसफाई लवकरात लवकर करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करताच पाटचाऱ्यांची दुरुस्ती व साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुर करण्यात आले आहे.

उबाठा शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांच्या या मागणीस यश आले आहे. ठाकरे गटाच्या साक्री तालुक्यातर्फे कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभागाचे पिंपळनेरचे शाखा अभियंता पी.व्ही.पवार, दप्तर कारकून यांना निवेदन देण्यात आले होते. रब्बी हंगामासाठी उजव्या व डाव्या कालव्याची साफसफाई व चार दिवसांत पाणी सोडण्यात यावे तसेच पाटचाऱ्यांची साफसफाई करण्यात यावी. रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे तसे न झाल्यास शिवसेना पिंपळनेर तालुक्याच्या व शेतकऱ्यांतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

या वेळी शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ,तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, संघटक तुषार गवळी, उपतालुकाप्रमुख मनोज खैरनार, शिवसेना शहरप्रमुख महेश वाघ, शहर संघटक अतुल चौधरी तसेच शेतकरी प्रतिनिधी सुदाम पगारे, वसंत घरटे, अरुण निकम, उमेश गवळी, पांडुरंग भदाणे, अमोल गांगुर्डे, प्रवीण राजपूत, अमोल शिंदे, सुभाष खैरनार, रत्नाकर भदाणे, अमृत भदाणे, मनोहर पगारे, हेमंत पगारे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता appeared first on पुढारी.