
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनोखी रक्षाबंधन साजरी करण्यात आली. धुळे शहरातील श्री संस्कार बालगृहातील निराधार, अनाथ, दिव्यांग मुलींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून घेतली.
त्याच पद्धतीने येथील स्टाफला, कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिका-यांनी राखी बांधून ओवाळले. यावेळेस बालगृहांमध्ये मोठे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यावेळेस अनाथ निराधार मुलींना आपल्याच घरी रक्षाबंधन केल्याचा आनंद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय चांगला प्रेरणादायी कार्यक्रम घेतला, असे सर्वत्र चर्चा या निमित्त होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या अनोख्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला रणजीत भोसले, सरोज कदम, शकीला बक्ष, तरुणा पाटील, संजिविनी गांगूर्डे, मंगेश जगताप, मनोज कोळेकर, राजू सोलंकी, रामेश्वर साबरे, महेंद्र शिरसाठ, राजू चौधरी, रईस काझी, राज कोळी, अमित शेख, मयुर देवरे, भिका नेरकर, स्वामिनी पारखे, सागर चौगुले, संतोष गायकवाड, गोलू नागमल, पठाण, बरकत अली, नजीर शेख तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्री संस्कार बाल गृहाचे चेअरमन सुनिल वाघ व त्यांच्या सर्व कर्मचारी वृध्दांनी अतिशय चांगले नियोजन व मदत केली.
हेही वाचा :
- नितीश कुमार यांना खरंच उपराष्ट्रपती व्हायचे होते का? आता त्यांनीच स्वतःच दिले उत्तर
- लोकनेते बाबूराव पाचर्णे यांचे निधन
- दौंडमधील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
The post धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसने साजरी केली अनोखी रक्षाबंधन appeared first on पुढारी.