
धुळे; पुढारी वृत्तसेवा : लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तयार करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज (दि.१८) शिवप्रतिष्ठानच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शहर आणि जिल्ह्यातील हजारो युवकांनी सहभाग नोंदवला.
केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा. धर्मांतर विरोधी कायदा करावा, श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. हा मोर्चा शहरातील आग्रा रोडवरून जेल रोडवर नेण्यात आला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत शिवप्रतिष्ठांनचे संजय शर्मा, शंकरराव कुलकर्णी, श्यामजी महाराज राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सत्यम गांधी यांनी सभास्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
दरम्यान, पठाण चित्रपटातील वादग्रस्त गाणे काढून टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या चित्रपटात अभिनेत्रीने भगव्या रंगाचे वस्त्र घालण्यावर आक्षेप नोंदविण्यात आला. गाणे हटवले नाही, तर संपूर्ण भारतात पठाण चित्रपट चालू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हेही वाचलंत का ?
- अजितदादा विदर्भात आल्याचा आम्हाला आनंद : उपमुख्यमंत्री फडणवीस
- सीमाप्रश्नी महाराष्ट्राची भूमिका सर्वोच्च न्यायालयात आजही कायम : देवेंद्र फडणवीस
- केजरीवाल, सत्येंद्र जैन यांचे कारनामे उघड करू : सुकेश चंद्रशेखर
The post धुळे : लव्ह जिहादविरोधात जनआक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.