
पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील वरसुस येथील अनुदानित प्राथमिक आश्रमशाळेतून दोन विद्यार्थ्यांचे अपहरण करण्यात आले. वरसुस आश्रमशाळेचे अधीक्षक दिलीप भानुदास पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी साडेसहा ते साडेसात वाजे दरम्यान घटना घडली. इयत्ता तिसरीतील सम्राट विशाल पवार (वय 8 वर्ष रा.कालदर ता.साक्री) व इयत्ता चौथीतील संतोष विनायक चौरे (वय 9वर्ष रा.कुहेर ता.साक्री)या दोघा विद्यार्थ्यास अज्ञात व्यक्तीने काहीतरी फुस लावून पळवून नेले. या फिर्यादीवरून निजामपूर पोलीसात अज्ञात आरोपींवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सपोनि एच.एल.गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती जाणून घेतली. तपास पोसई जयेश गांगुर्डे करीत आहेत.
हेही वाचा :
- हातकणंगले मतदारसंघातून जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात?
- Khichdi Scam Case: कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी
The post धुळे : वरसुस आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे अपहरण appeared first on पुढारी.