धुळे : वादळी पावसामुळे कापडणे येथे फळ बागायतीचे, कापूस पिकांचे नुकसान

धुळे; पुढारी वृत्तसेवा : कापडणे व परिसरात मोठ्या प्रमाणात वारा, वादळ व पावसामुळे फळ बागायतीचे व कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी केली. याप्रसंगी कापडण्याचे माजी पं.स.सदस्य राम भदाणे, भटू आबा, भटू वाणी,उमाकांत खलाणे, दुर्गेश पाटील, महेंद्र खलाणे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी बापू दौलत माळी उपस्थित होते.

नगांव, कापडणे परिसरात मोठ्या प्रमाणात वादळ व पावसाने फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच कापूस पिकाचेही मोठे नुकसान झालेले आहे. या वादळामुळे कापडणे येथील शेतकरी बापू दौलत माळी यांच्या शेतातील शेवग्याची अनेक झाडे खाली पडून मोठे नुकसान झालेले आहे. या सर्व नुकसानीची माहिती शेतकरी बापू दौलत माळी यांनी दिली. या संदर्भात राम भदाने यांनी संबंधीत यंत्रणेला सर्व नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्यास सांगीतले. यासाठी शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असे यावेळी सांंगीतले. धुळे तालुक्यात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून या अवकाळी पावसाने शेतकरी झालेल्या नुकसानीमुळे हैराण झाला आहे.

वादळी पावसामुळे कापडणे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी जि.प.सदस्य राम भदाणे यांनी केली. याप्रसंगी माजी पं.स.सदस्य रविंद्र आत्माराम पाटील, माजी उपसरपंच भटू आबा, सुरेश पाटील, भटू वाणी, महेंद्र खलाणे, दुर्गेश किशोर पाटील, उमाकांत खलाणे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

The post धुळे : वादळी पावसामुळे कापडणे येथे फळ बागायतीचे, कापूस पिकांचे नुकसान appeared first on पुढारी.