धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे. या अपघातात दोन गायींचा जागीच मृत झाला आहे. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्या आहेत. सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे.
याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (एमएच ०४ डीएस ९३९१) या वाहनात सहा गोवंश निर्दयतेने कोंबून त्यांची कत्तलीसाठी वाहतूक करण्यात येत होती. पहाटे साक्री तालुक्यातील सुकापूर ते होळ्याचापाडा या रस्त्याने जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक डीपीजवळ एका शेतात उलटली. या अपघातात दोन गायी जागीच ठार झाल्या तर चार गायी वाचल्या. यानंतर चालक घटनास्थळावरुन पसार झाला.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येवून मृत गोवंशाचे शवविच्छेदन केले. तर पंकज वाघ व रवींद्र सूर्यवंशी यांनी चार गायींची रवानगी गोशाळेत केली. शिवाय १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे पिकअप वाहन जप्त केले. वाहन चालकासह मालकाविरूद्ध पोकॉ. पंकज वाघ यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Nagpur : स्वतःला कारमध्ये पेटवून घेत व्यावसायिकाची आत्महत्या: पत्नी आणि मुलालाही संपविण्याचा प्रयत्न
- पुणे : जिल्ह्यातील वीस लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’
- पुणे : जिल्ह्यातील वीस लाख घरांवर फडकणार ‘तिरंगा’
The post धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू appeared first on पुढारी.