धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच

Amrish patel www.pudhari.news

धुळे: पुढारी वृत्तसेवा

शिरपूर तालुक्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे आमदार अमरीश भाई पटेल यांचे वर्चस्व दिसून आले आहे. या तालुक्यातील 33 पैकी तब्बल 32 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तालुक्यातील मोहिदा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा सदस्य निवडून आला असून उर्वरित सर्व ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा वर्चस्व दिसून आले आहे.

शिरपूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींच्या 122 प्रभागांमध्ये 339 सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया राबवण्यात आली. तर 33 ग्रामपंचायतींच्या थेट जनतेमधून सरपंच निवडीपदासाठी मतदान घेण्यात आले. या तालुक्यात 79.50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये 30563 महिला तर 33 हजार 757 पुरुष अशा 64 हजार 320 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, सोमवारी, दि.19 सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. शिरपूर तालुक्यात आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व असल्याने या ग्रामपंचायतींमधून बहुसंख्य ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीकडे जाणार असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच दिसून येत होते. निकालात 32 ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीकडे गेल्याचे स्पष्ट झाले असून अवघी एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसला घेता आली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना या तालुक्यांमध्ये भोपळाही फोडता आला नसून काँग्रेसची देखील पीछेहाट झाली आहे.

हेही वाचा:

The post धुळे : शिरपूरमध्ये भाजपा आमदार अमरीशभाई पटेल यांचे वर्चस्व; 33 पैकी 32 ठिकाणी भाजपाचे सरपंच appeared first on पुढारी.