
धुळे, पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर व शिरपूर सर्कलमधील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिक विमाचा 26 हजार 500 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे पहिला हप्ता जमा झाला आहे.
शिरपूर तालुक्यातील होळनांथे, थाळनेर, शिरपूर, अर्थे, बोराडी, जवखेडा, सांगवी या सात सर्कल मधील शेतकरी बांधवांच्या खात्यावर 43 हजार 500 रुपये प्रमाणे पिक विमाचा दुसरा हप्ता जमा झाला आहे. पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत रिलायन्स विमा कंपनी तर्फे ही अंमलबजावणी सुरु आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा पिक विमा मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या प्रयत्नाने पिक विमा मंजूर झाल्याने शेतकरी बांधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे.
हेही वाचा
सांगली : सरदार पाटील यांनी बोलताना भान ठेवून बोलावे; प्रमोद सावंत
रामोशी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
धुळे: ‘आप’चा मंगळवारी शेतकरी मेळावा; शासनाकडे विविध मागण्या करणार
The post धुळे: शिरपूर तालुक्यातील केळी पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा appeared first on पुढारी.