धुळे : शिरपूर पॅटर्न मधून 330 बंधारे बांधल्याने भूजल पातळीत वाढ; अमरिशभाई पटेल

धुळे; पुढारी वृत्तसेवा : आतापर्यंत शिरपूर पॅटर्न मधून 330 बंधारे पूर्णपणे बांधले असून यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आताही मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचे काम हाती घेतले असून अनेक बंधारे यापुढे देखील पूर्ण करायचे आहेत. आतापर्यंत तालुक्यात 20 हजार हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली आणली आहे. अरुणावती नदीचे पाणी तापी नदी पर्यंत अनेक बंधारे बांधून अडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ,आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

शिंगावे गावात नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समिती सभापती वसंत पावरा, उपसभापती विजय बागुल, तसेच इतर अनेक नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व शिंगावे गावातील असंख्य नागरिक व युवकांचा भाजपा मध्ये प्रवेश सोहळा माजी मंत्री आमदार अमरिशभाईंच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.

यावेळी आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, शिरपूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका 100 टक्के भाजपमय करायचा आहे. स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या सोबत यापूर्वी मी याच पक्षात होतो. आतापर्यंत तालुक्याच्या विकासात मागील सर्व आमदारांचे योगदान आहे. आज असंख्य कार्यकर्ते, युवक व ज्येष्ठ नागरिक यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याचे तसेच शिंगावे गावाचा विकास पाहून मला मनापासून आनंद होतोय. आतापर्यंत शिरपूर पॅटर्न मधून 330 बंधारे पूर्णपणे बांधले असून यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, आताही मोठ्या प्रमाणात जलसिंचनाचे काम हाती घेतले असून अनेक बंधारे यापुढे देखील पूर्ण करायचे आहेत. तालुक्यातील शेतकरी सुखी संपन्न व्हावी व्हावा, सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरवाहू शेतकऱ्या ची जमीन सिंचनाखाली मी आणतोय. आतापर्यंत तालुक्यात 20 हजार हेक्टर पेक्षा जास्त जमीन सिंचन खाली आणली आहे. अरुणावती नदीचे पाणी तापी नदी पर्यंत अनेक बंधारे बांधून अडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अनेक पिढ्याना पाण्याची कमतरता भासणार नाही असे कार्य सुरु आहे. तालुक्यात अनेक गुणवंत व दर्जेदार अत्याधुनिक शैक्षणिक दालने उभे केले असून हजारो विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबांना सुखी संपन्न केले आहे. आपल्या मुलाना चांगले शिक्षण द्या, त्यांच्यावर पूर्णपणे लक्ष द्या, काळजी घ्या, शिक्षणानेच गरिबी दूर होईल, सर्वांसाठी शिक्षणाची सोय केली आहे, एकमेकांना सहकार्य करा. आतापर्यंत हजारो युवकाना रोजगार उपलब्ध केला असून भविष्यात देखील नियमित पणे काम सुरुच राहील. अत्याधुनिक आरोग्य सेवा कमी खर्चात देण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करुन थेट माणसासाठी काम करतोय. एस. व्ही. के. एम. ही देशातील व जगातील सर्वोत्तम संस्था आहे. लवकरच आपण आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पॅरामेडिकल, डेंटल, नर्सिंग कॉलेज सुरू करणार असून सर्वांसाठी उत्तम सेवा पुरविण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अश्विनी पाटील, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा बँक संचालक प्रभाकरराव चव्हाण, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा, उपसभापती विजय बागुल, सरपंच सौ. मंजुळाताई पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, भरत पाटील, भिमराव ईशी, विजय पारधी, निंबा पाटील, योगेश बोरसे पिळोदा, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, संजय आसापुरे, पंचायत समिती सदस्य यतिष सोनवणे, जगतसिंग राजपूत, वसंत बाविस्कर, रविंद्र गुजर, सुरेश अहिरे, राधेश्याम भोई, प्रभाकर पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते.

The post धुळे : शिरपूर पॅटर्न मधून 330 बंधारे बांधल्याने भूजल पातळीत वाढ; अमरिशभाई पटेल appeared first on पुढारी.