धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा

धुळे : पंतप्रधानांचा वाढदिवस,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शिवसेना धुळे महानगराच्यावतीने राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान युवक काँग्रेसने देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागत राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला.

यावेळी शिवसेनेने तीव्र शब्दात टीका केली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. गेल्या 8 वर्षांपासून नरेंद्र मोदी हे भारताचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या काळात प्रचंड महागाई व बेरोजगारी वाढली असून देशभरातील लाखो युवक रोजगारापासून अद्यापही वंचित आहेत. भारत सरकारच्या अधिपत्याखालील सर्वच मोठ्या संस्था व उद्योग तसेच कारखाने हे भांङवलदारांना विकण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. देशाच्या कुठल्याच पंतप्रधानांच्या काळात झाले नाही एवढे राष्ट्रीय योजनांचे खासगीकरण नरेंद्र मोदींच्या काळात झाले असल्याची टिका शिवसैनिकांनी केली.

महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांसाठी नोकरीची उत्तम संधी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या महसुलात करोडो रूपयांची भर टाकणारा 1.58 लाख कोंटींचा फाॅक्सकाॅमचा प्रकल्प त्यांनी आपल्या कर्मभुमी गुजरात राज्यात शिफ्ट करून महाराष्ट्रातील दिड लाख युवकांना बेरोजगार करण्याचे काम केले आहे. या आधीही महाराष्ट्रातील कित्येक प्रकल्प, उद्योग आणी सरकारी कार्यालये त्यांनी मुंबई व महाराष्ट्रतून गुजरातला स्थलांतरित केले. महाराष्ट्रातील लाखो युवकांना बेरोजगार केले असा आरोप यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

आतापर्यंतच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि रोजगाराच्या नावाखाली युवकांना चाॅकलेट देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना धुळे महानगर वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प व चाॅकलेट देऊन वास्तव वादी प्रतिकात्मक शुभेच्छा देऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा केला जात असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, जिल्हासंघटक भगवान करनकाळ, मा.आ.प्रा.शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील, ङाॅ.सुशील महाजन, शहर संघटक देवीदास लोणारी, विधान सभा संघटक ललित माळी, महीला आघाङीच्या ङाॅ. जयश्री वानखेङे, विनोद जगताप, आण्णा फुलपगारे, संदीप सुर्यवंशी, नंदलाल फुलपगारे, संदिप चव्हाण, छोटुभाऊ माळी, प्रविण साळवे, संजय जवराज, प्रकाश शिंदे, सुनिल चौधरी, बाबुराव नेरकर, सुभाष मराठे, हाजी रफीक पठाण, काळु गावङे, संदिप चौधरी, महादु गवळी, कैलास मराठे, रोहित धाकङ, पिनु सुर्यवंशी, हेमराज साळुंखे, अमोल ठाकूर, अनिल शिरसाठ, दिनेश विष्णु पाटील, विजय बोरसे, कमलेश भामरे, लक्ष्मण बोरसे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान धुळ्यात युवक काँग्रेसने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बेरोजगारी वाढवण्याचा आरोप करीत आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जवाहर सूतगिरणी संचालक एस.एम. पाटील, धुळे जिल्हा प्रभारी गौरव पानगव्हाणे, जिल्हाध्यक्ष धुळे काँग्रेस गणेश मधुकर गर्दे, शहराध्यक्ष नावेद शेख, माजी जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंखे, राजीव पाटील माजी प्रदेश सचिव, सतीश रवंदळे, तालुका अध्यक्ष हरीश पाटील, शहर उपाध्यक्ष सलमान मिर्झा, उपाध्यक्ष लंकेश पाटील, मनोहर पाटील, निलेश खैरनार, रमेश सूर्यवंशी, बबलू सूर्यवंशी, राहुल साखरे, रिजवान अन्सारी, प्रवीण पाटील, उदय पाटील, विकास पाटील, राहुल भदाणे, राज पाटील, राजू बैसाने आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post धुळे : शिवसेनेकडून पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.