
धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यातील मोराणे प्र.ल. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकाचे आ. कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामाचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवार (दि.19) शिवजयंतीदिनी भूमीपूजन सोहळा पार पडला. या स्माकाच्या सुशोभिकरणासाठी आ. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रविवार (दि.19) रोजी धुळे ग्रामीण मतदारसंघातील मोराणे प्र.ल.येथे असलेल्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्मारकाचे सुशोभिकरण कामाचा प्रारंभ आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र सुर्यवंशी हे होते. स्माकाच्या सुशोभिकरणासाठी आ. कुणाल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकांचे सुशोभिकरण होणे ही अभिमानाची बाब आहे. या स्मारकामुळे आपल्याला प्रेरणा मिळते. महाराजांचा शौर्याचा इतिहास मनामनात स्फूर्ती निर्माण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यातील प्रत्येक समाजातील घटकाला सोबत घेवून स्वराज्य निर्माण केले. हीच शिकवण आपल्याला पुढे न्यायची आहे. धुळे तालुक्यातील प्रत्येक गावात विकासासाठी जी जी कामे करायची आहेत, त्या कामांना प्राधान्य देत विकास निधी मंजूर करुन आणण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही आ. पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, ज्येष्ठ नेते कन्हैय्याल पाटील, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार, युवा नेते ऋषी ठाकरे, मयुर ठाकरे, माजी पंचाय सदस्य शिरीष सोनवणे, डॉ.योगेश ठाकरे, संजय बोरसे, नगरसेवक आबा नांद्रे, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, नारायण पवार, गिरीष पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा:
- दिल्ली: महाराष्ट्र सदनात शिवजयंती उत्साहात
- मराठीत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन (पाहा व्हिडिओ)
- Shiv Jayanti : राज्यातील 50 दृष्टीहीन युवक-युवतींची किल्ले शिवनेरीला भेट
The post धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर appeared first on पुढारी.