Site icon

धुळे : शेणपूर येथे भीषण आग, शॉर्टसर्किटमुळे ५०० क्विंटल मक्याचा चाऱ्यासह, गोठा जळून खाक

पिंपळनेर,(ता.साक्री),पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेणपूर येथील निखिल शरद काळे यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला विद्युत वाहिनीच्या तारा लोमकळल्याने स्पार्किंग झाले. यानंतर भीषण आग लागून पाचशे क्विंटल मक्याच्या चाऱ्याची गंजी आणि गोठा जळून खाक झाला. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तेथील स्थानिक शेतमजुरांनी सांगितले. त्यानंतर गावातील सुमारे ३०ते ४० लोक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत म्हणजेच साडेसात ते साडेआठ वाजेपर्यंत गावकऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

तेथील शेती पंपाची लाईट सुरू असल्यामुळे विहिरीच्या पाण्याद्वारे पाईपलाईनने आग विझवणे मदत झाली. सुदैवाने या आगीच्या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी असलेल्या जवळच एक शेडमध्ये काही जनावरे बांधलेली होती. मात्र, प्रसंग अवधान राखून ही जनावरे तिथून काढण्यात आली व शेडही जाळून खाक झाले आणि त्यानंतर तेथील काही अंतरावरच कांदा चाळ असल्याने तेथेही सुमारे ३० क्विंटल कापूस ठेवलेला होता. परंतु, गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तेथे पर्यंत आग पोहोचू दिली नाही. आग एवढी भीषण होती की गावातील युवकांना देखील आगीवर नियंत्रण आणणे कठीण झाले होते.

हेही वाचंलत का?

The post धुळे : शेणपूर येथे भीषण आग, शॉर्टसर्किटमुळे ५०० क्विंटल मक्याचा चाऱ्यासह, गोठा जळून खाक appeared first on पुढारी.

Exit mobile version